Latest NewsMaharashtra Politics

अजित पवार विमान अपघात की घातपात? ‘पायलट सुसाईड बॉम्बर होता’, अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोप!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघाताने महाराष्ट्र हादरला होता. मात्र, आता या अपघाताला एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी हा केवळ अपघात नसून एक जाणीवपूर्वक रचलेला ‘मर्डर प्लॅन’ असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी ‘व्हीएसआर’ (VSR) विमान कंपनीवर थेट निशाणा साधत अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘पायलट सुसाईड बॉम्बर आणि ५० कोटींचा विमा’

अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात थेट ‘सुसाईड बॉम्बर’ थिअरी मांडली आहे. त्यांच्या दाव्यानुसार:

  • विमा रक्कम: विमान कंपनीने (VSR) डिसेंबर २०२५ मध्ये आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल ५० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता.
  • आमिष: “पायलटला ५० कोटींच्या विम्याचे आमिष दाखवून सुसाईड बॉम्बरप्रमाणे वापरले गेले का? कुटुंबाची काळजी आम्ही घेऊ, असे कंपनीने सांगितले होते का?” असा सवाल मिटकरींनी केला आहे.
  • हिप्नोटिझम: त्यांनी या घटनेची तुलना अजमल कसाबशी करत, पायलटला ‘हिप्नोटाईज’ करून हा घातपात घडवला असावा, अशी शंका व्यक्त केली.

विमान आणि तांत्रिक बिघाडाचे पुरावे

मिटकरी यांनी विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काही धक्कादायक माहिती दिली: १. नादुरुस्त विमान: ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, ते विमान वर्षभरापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होते. तरीही ते प्रवासासाठी का वापरले गेले? २. पायलटची अदलाबदल: प्रवासाच्या अगदी शेवटच्या क्षणी पायलट बदलण्यात आला. तो शेवटचा पायलट कोण होता आणि त्याला कोणी नियुक्त केले? ३. ‘मे-डे’ कॉलचा अभाव: विमान संकटात असताना वैमानिकाने कंट्रोल रूमला कोणताही आपत्कालीन ‘मे-डे’ (Mayday) कॉल का दिला नाही?

अपघाताच्या ठिकाणची संशयास्पद स्थिती

घटनास्थळावरील परिस्थिती पाहता मिटकरींनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:

  • गायब मृतदेह: विमानात ६ जण होते, पण घटनास्थळी फक्त ५ मृतदेह सापडले. सहावा व्यक्ती कोण आणि कुठे आहे?
  • अजितदादांचे घड्याळ: अपघातात मृतदेह जळाले, कागदपत्रे वाचली, पण अजित पवारांचे घड्याळ मात्र गायब झाले.
  • CCTV फुटेज: मुंबई विमानतळावरील त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“अजितदादा इतके सामान्य नेते नव्हते की त्यांचा मृत्यू इतक्या सहजासहजी स्वीकारावा. या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी व्हायलाच हवी. ब्लॅक बॉक्सचा अहवाल येण्याआधीच हे सर्व पुरावे समोर येणे गरजेचे आहे,” असे अमोल मिटकरी यांनी ठामपणे सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button