गो. से. महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

खामगाव::- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त “जागर स्त्री पुरुष समानतेचा” हा सप्ताह साजरा करण्यात आला होता. या सप्ताहांतर्गत महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समिती आणि इनर व्हील क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 06 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रशिक्षण वर्ग खामगाव शहरातील सर्व मुले, मुली व महिला आणि पुरुष या सर्वांसाठी खुला होता. या प्रशिक्षण वर्गामध्ये कुडो, तलवार आणि लाठीकाठी याचे प्रशिक्षण देण्यात आले. हा प्रशिक्षण वर्ग एकूण 20 दिवसांसाठी होता. यामध्ये एकूण 75 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व व्यवस्थित रित्या प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला. दिनांक 04 फेब्रुवारी 2026 रोजी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर सर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. अजिंक्यदादा बोबडे (कोषाध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. स्वाती अग्रवाल (अध्यक्षा इनर व्हील क्लब खामगाव), तसेच सौ. नेहा गणात्रा (सचिव इनरव्हील क्लब खामगाव), उपस्थित होते. प्रा. खांडे मॅडम (मुख्याध्यापिका स्वर्गीय शंकररावजी बोबडे ज्ञानमंदिर खामगाव), अलका अग्रवाल (उपाध्यक्ष इनरव्हील क्लब खामगाव), अंजू अग्रवाल माजी (अध्यक्ष इनरव्हील क्लब खामगाव), डॉ. बोचे मॅडम तसेच डॉ. रेश्मा मारवाडी मॅडम समन्वयक (महिला सक्षमीकरण महिला उद्योजकता विकास समिती) प्रशिक्षक कुणाल सोनले यांनी व्यासपीठावर आपले स्थान भूषवले. सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्माननीय व्यासपीठाकडून प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षक कुणाल सोनले, यश सोनले श्रुती आटोळे, नेहा नटकुट, यश जामोदे यांचा व्यासपीठाकडून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. श्री अजिंक्यदादा बोबडे यांनी स्वसंरक्षण हे आजच्या काळामध्ये किती महत्त्वाचे आहे हे सांगितले आणि स्वसंरक्षण ची गरज ही फक्त मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा आहे. आपल्या जीवनाचा आवश्यक भाग म्हणजे स्वसंरक्षण होय, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा ही दिल्या. अध्यक्ष भाषण करताना डॉ. डी. एस. तळवणकर सर यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण हे फक्त आज पुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण आयुष्यामध्ये याचा व्यवस्थित अभ्यास करत राहावा. आणि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी सुद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजच्या या काळामध्ये स्वसंरक्षणाचे कौशल्य प्रत्येक व्यक्तीला आवश्यक ठरते असे सांगितले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वृषाली घोराळे, यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप यांनी केले. या प्रशिक्षण वर्गाला यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाच्या सर्व सन्माननीय प्राध्यापकांनी प्रा. पूनम तिवारी समन्वयक (स्वसंरक्षण समिती), डॉ. योगेश म्हैसागर, प्रा. प्रदीप बाणाइत, प्रा. वृषाली घोराळे, प्रा. नयना मिश्रा, प्रा. राज फाटे, प्रा. वर्षा कोकाटे, डॉ. दिपाली धरमकार, प्रा. खंडारे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले तसेच शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल चंदनकार, अभय मोहिते या सर्वांनी कार्यक्रमाला यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.



