कर्मचायांनी विद्यापीठासाठी कुटुंब समजून कार्य केले – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

विद्यापीठात सेवानिवृत्तप्रसंगी कर्मचायांचा सत्कार
अमरावती – विद्यापीठातून सेवानिवृत्त होणाया कर्मचायांच्या कष्टाने व निष्ठेने या विद्यापीठाचा वटवृक्ष बहरला आहे. त्यांची सेवा संपली असली, तरी त्यांचा स्नेह विद्यापीठासाठी कायम असून त्यांनी आपल्या सेवाकाळात विद्यापीठाकरीता कुटुंब समजून कार्य केले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी म्हणून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती श्री सुरेंद्र गुल्हाने, श्री नरेंद्र खैरे, श्री संजय काळे तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, आजचा हा क्षण खूप भावनिक आहे. ज्याप्रमाणे जेवणात मीठ नसेल, तर मीठाची गरज भासते, त्याचप्रमाणे कर्मचायांची उपस्थिती ही विद्यापीठासाठी महत्वाची आहे. कर्मचारी निवृत्त होत असतांना आम्हाला खंत वाटते, कारण त्यांचा अनुभव सुद्धा निवृत्त होत आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात या विद्यापीठाच्या विकासासाठी, सेवा देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. समाधानाने व आनंदाने निवृत्त होत असल्याच्या चांगल्या भावना त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितल्या. निश्चितच ही विद्यापीठासाठी पावती आहे. त्यांचे पाल्यही आज उच्च पदावर कार्यरत आहे, ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. मनाची व नात्याची श्रीमंती सेवानिवृत्त कर्मचायांनी जबाबदारीने ठेवली आहे, असे सांगून त्यांनी सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या शुभकामना दिल्यात. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सत्कारमूर्ती श्री सुरेंद्र गुल्हाने, श्री नरेंद्र खैरे व श्री संजय काळे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार केला, तर सौ. गुल्हाने, सौ. खैरे व सौ. काळे यांचा सौ. मोनाली तोटे पाटील, सौ. मनिषा कुहेकर व सौ. स्मिता म्हैसाळकर यांनी साडी-चोळी व कुंकवाचा करंडा देवून सत्कार केला.
प्रमुख अतिथी डॉ. हेमंत देशमुख म्हणाले, कर्मचायांनी आपल्या सेवाकाळात जे कार्य केले व परिश्रम घेतलेत, त्यामुळेच विद्यापीठाचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचला आहे. मी परीक्षा संचालक असतांना कर्मचारी किती जबाबदारीने व वेळेत काम करतात, हे मी जवळून पाहिले आहे, एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवले सुद्धा आहे. सेवानिवृत्त कर्मचायांनी आपल्या आयुष्याची तीस-चाळीस वर्षे या विद्यापीठाला दिली आहेत. त्यांचा सत्कार हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा असून त्यांचे नातेवाईक सुद्धा यावेळी मोठ¬ा संख्येने उपस्थित आहेत, असे सांगून त्यांनी सर्व सत्कारमूर्तींना भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कारमूर्ती श्री सुरेंद्र गुल्हाने, श्री नरेंद्र खैरे व श्री संजय काळे यांनी मनोगतातून आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेल्या प्रेम, स्नेहभावाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच डॉ. नितीन कोळी, श्री मंगेश वरखेडे व विद्यापीठ कर्मचारी संघाचे श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या व दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे,उपाध्यक्ष डॉ. अविनाश असनारे, सचिव डॉ. श्रीकांत तायडे व कोषाध्यक्ष श्री राजेश एडले यांनी सत्कारमूर्तींचा भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार भांडार विभागाचे डॉ. धनंजय पाटील यांनी मानले. श्री सुरेंद्र गुल्हाने यांचा त्यांच्या नातेवाईकांकडून सुद्धा याप्रसंगी सहर्ष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे, कर्मचारी संघाचे माजी अध्यक्ष श्री भैय्यासाहेब भारंबे, माजी सचिव श्री विलास सातपुते, श्री अशोक धाबे यांचेसह विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



