AmravatiLatest News

देशाचा सर्वांगीण विकास हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन – डॉ. विजय खरे

विद्यापीठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा’ विषयावर व्याख्यान संपन्न

अमरावती (दि.31.01.2026)-   राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान नागरिकत्व बहाल केले. राज्यघटनेमध्ये कलम 352, 356 आणि 360 या कलमांचा अंतर्भाव करुन देश एकसंघ केला. कलम 356 देशाची अखंडता कायम ठेवते. राष्ट्राचा विचार करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा सर्वांगीण विकास हा  दृष्टिकोन  ठेवला, असे प्रतिपादन पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने स्व. श्री गोविंदाजी खोब्राागडे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाणा विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.

                 डॉ. विजय खरे विषयाची मांडणी करतांना म्हणाले,  जगावर अधिराज्य गाजविण्याच्या प्रयत्नातून जगात आज हल्ले होत आहेत. नौदल, भूमी, आकाश आपल्याच ताब्यात असले पाहिजे यासाठी प्रयत्न होत आहेत व त्यातूनच राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तिसरे महायुध्द जर झाले, तर त्याचा केंद्रबिंदू सुध्दा चीन आणि भारत असू शकतो, असा अंदाजही डॉ. खरे यांनी वर्तविला. डॉ. बाबासाहेबांना चौकटीत बांधून न ठेवता येणा-या पिढ¬ांना आजच नव्या रुपाने सांगा, जेणेकरुन येणा-या पुढील पिढ¬ा आपला सन्मान करतील, असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.
                  प्रमुख अतिथी डॉ. अनिल हिरेखण म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू आज व्याख्यातांनी मांडला. स्वातंत्र्यपूर्व काळात सरसेनापती ही पदवी होती, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये ते येवू दिले नाही. लष्कर, नौदल, वायुदल हे तीनही वेगवेगळे ठेवून राष्ट्रपतींचे त्यांच्यावर नियंत्रण ठेवले आणि तीनही दलाचे प्रमुख सुध्दा आपल्या परिने निर्णय़ घेवू शकत नाहीत. एवढेच नाही, तर राष्ट्रपती सुध्दा संसदेच्या मान्यतेशिवाय निर्णय घेवू शकत नाही, असेही ते म्हणाले.
                   अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व हे अफाट आहे. एखादा ग्रंथ वाचावा आणि तो संपता संपत नाही, असे डॉ. बाबासाहेब सर्वव्यापी आहेत. संत गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेकांशी जवळीक नाते होते. त्यामुळे या दोन्ही विभूतींच्या विचारांची सांगड घालून विद्यापीठामध्ये संविधान शिल्पाची उभारणी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची राष्ट्राप्रती असलेली भावना आदींची पुनर्मांडणी झाली पाहिजे, जेणेकरुन येणा-या नवीन पिढ¬ांना ते समजेल असेही कुलगुरू म्हणाले.
                    संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, मेणबत्ती प्रज्वलित करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी एकता रॅली समितीच्यावतीने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन तर डॉ. आंबेडकर थॉटमध्ये आचार्य पदवी प्राप्त करणा-या वंदना धवणे यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड, सूत्रसंचालन डॉ. जगदीश गोवर्धन यांनी, तर आभार डॉ. गजानन सोडनर यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक, डॉ. गजानन मुळे, डॉ. वैशाली  धनविजय, प्राचार्य डॉ. अरुणा वाडेकर, माजी परीक्षा नियंत्रक भी. र. वाघमारे, श्री खोब्राागडे कुटुंबातील सदस्य, आंबेडकर चळवळीतील गणमान्य नागरिक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने व्याख्यान कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button