AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग युडीआरएफ मध्ये प्रथम, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विभाग प्रमुख डॉ. सदीप वाघुळे यांचा सत्कार

अमरावती (दि. 27.01.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने युनिव्र्हसिटी डिपार्टमेन्ट रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल विद्यापीठात आयोजित माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप वाघुळे यांाचा सत्कार करण्यात आला.
राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठांतील विविध विभागांकडून संशोधनाला चालना देणे, उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर कार्यक्षम वापर करणे, कार्यपध्दतीत पारदर्शकता आणि जबाबदारी आणणे व एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे, यासाठी विद्यापीठांतर्गत विभागांना मानांकन देण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राबविण्यात येतो. यामध्ये भौतिकशास्त्र विभागाने उल्लेखनिय कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकाविला. नुकत्याच झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे तसेच विभागातील अध्यापक सहका-यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एस. के. ओमनवार उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी भौतिकशास्त्र विभागाने विद्यापीठाच्या नावलौकिकात मोलाची भर घातल्याबद्दल समाधान व्यक्त करुन भविष्यात अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आवाहन केले. तर डॉ. संदीप वाघुळे यांनी विद्यापीठ प्रशासन, अध्यापन व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्याथ्र्यांचे सहकार्य व पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button