AmravatiLatest Newspolitics

अमरावती महापालिकेत ६ फेब्रुवारीला महापौर-उपमहापौर निवड; विशेष सर्वसाधारण सभा आयोजित

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अमरावती महानगरपालिका येथे पार पडणार आहे.

विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या आदेशानुसार ही सभा जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सभेचा प्रमुख अजेंडा महापौर व उपमहापौर पदाची निवड हा आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार अमरावती महानगरपालिकेतील महापौर पद ‘सर्वसाधारण प्रवर्गासाठी’ आरक्षित करण्यात आले आहे.

महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा राहणार असून निवडणूक प्रक्रिया हात वर करून मतदान या पद्धतीने पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६.१५ या वेळेत नगरसचिव कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी सभेच्या सुरुवातीलाच करण्यात येणार असून उमेदवारी मागे घेण्यासाठी निश्चित नियमावली लागू राहणार आहे.

महापौर पदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर नव-नियुक्त महापौर हेच उर्वरित उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button