Crime NewsLatest NewsNagpur

नागपुरात रेशन धान्याचा मोठा काळाबाजार उघड; पारडी पोलिसांची धडक कारवाई

नागपूरच्या पारडी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गरिबांच्या हक्काच्या रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रेशन माफियांवर पारडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज, २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका संशयास्पद ठिकाणावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. तिथे रेशनचा हजारो क्विंटल गहू साठवून ठेवलेला आढळून आला आहे. या गहू साठ्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने, पोलिसांनी तात्काळ हा हजारो क्विंटल गहू जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, रेशनचा हा काळाबाजार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता, याचा तपास आता सुरू झाला आहे. वरिष्ठपोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी या संपूर्ण कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button