गो. से. महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान

खामगांव:- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या अभियानांतर्गत वाहन चालविताना घ्यावयाची आवश्यक काळजी, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, हेल्मेट व वाहनचालक परवान्याचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षा विषयक संदेश असलेले बॅनर महाविद्यालयाच्या गेट क्रमांक १ जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर लावण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी विद्यार्थ्यांना वाहन चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून देत, अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रास्तावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. देवनंदन अढाऊ यांनी केली. यावेळी महाविद्यालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे वाहनचालक परवाने तपासून सुरक्षित वाहनचालनाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. उमेश खंदारे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रस्ता सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला. या जनजागृती अभियानामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित वाहनचालनाचा संदेश देण्यात यश आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. दादासाहेब बोबडे व सचिव सन्माननीय डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात प्रा. डॉ. आठवर, प्रा. डॉ. टकले, कर्मचारी श्री. विठ्ठल चंदनकार, सुरक्षा कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



