Latest NewsMaharashtra

ST, SC, OBC की ओपन… कोणत्या महापालिकेत कोणता महापौर बसणार? आरक्षण सोडतीची संपूर्ण यादी

Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation Updates: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज महापौरपदांसाठीच्या आरक्षणची सोडत काढण्यात आली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण 22 जानेवारीला सकाळी 11 वाजतल्यापासून मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये काढण्यात आलं. चक्राकार पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. राज्यातील कोणत्या महानगरपालिकेतील महापौराचं पदावर कोणतं आरक्षण पडलं आहे हे आपण इथे जाणून घेणार आहोत…

चक्राकार पद्धतीने निवड म्हणजे काय?
सोडत चक्राकार पद्धतीने (रोटेशनल/सर्क्युलर पद्धत) काढण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते. महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झालं असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया आता सुरू होईल आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. सुरु असलेल्या चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आल्याने, सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग वगळता उर्वरित प्रवर्गांपैकी (जसे एससी, एसटी, ओबीसी, महिला इत्यादी) एखादे आरक्षण निघण्याची शक्यता आहे. मागील महापौरपद 2020 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्यामुळे या चक्राकार पद्धतीने एससी (SC) किंवा ओबीसी (OBC) प्रवर्गाचे आरक्षण निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्या महानगरपालिकेत कोणतं आरक्षण?

अ.क्र.महानगरपालिकेचे नावआरक्षित प्रवर्ग (Reservation Category)
1बृहन्मुंबई (BMC)खुला प्रवर्ग (ओपन) (महिला)
2ठाणेअनुसूचित जाती (एससी)
3कल्याण-डोंबिवलीअनुसूचित जमाती- एसटी
4नवी मुंबईखुला प्रवर्ग (ओपन) (महिला)
5वसई-विरारखुला प्रवर्ग (ओपन)
6भिवंडी-निजामपूरसर्वसाधारण (महिला)
7मीरा-भाईंदरखुला प्रवर्ग (ओपन) (महिला)
8उल्हासनगरओबीसी
9पुणेखुला प्रवर्ग (ओपन)
10पिंपरी-चिंचवडखुला प्रवर्ग (ओपन)
11नागपूरखुला प्रवर्ग (ओपन) (महिला)
12अहिल्यानगरओबीसी (महिला) 
13नाशिकखुला प्रवर्ग (ओपन)
14छत्रपती संभाजीनगरखुला प्रवर्ग (ओपन)
15अकोलाओबीसी (महिला) 
16अमरावतीखुला प्रवर्ग (ओपन)
17लातूरअनुसूचित जाती (एससी)
18नांदेड-वाघाळाखुला प्रवर्ग (ओपन) (महिला)
19चंद्रपूरओबीसी (महिला) 
20धुळेखुला प्रवर्ग (ओपन) (महिला)
21जळगावओबीसी (महिला) 
22मालेगावखुला प्रवर्ग (ओपन)
23कोल्हापूरओबीसी
24सांगली-मिरज-कुपवाडखुला प्रवर्ग (ओपन)
25सोलापूरखुला प्रवर्ग (ओपन)
26इचलकरंजीओबीसी
27जालनाअनुसूचित जाती (एससी)
28पनवेलओबीसी
29परभणीखुला प्रवर्ग (ओपन)

कशी काढण्यात आली ही ‘महापौर’पदाची आरक्षण सोडत?

महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढण्यात आलं. 

साधारणत: मागील 20 वर्षांचं आरक्षण लक्षात घेण्यात आलं. 

जे आरक्षण याआधी त्या महापालिकेत होतं, ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी काढली गेली. 

एससी, एसटी, ओबीसी आणि खुला वर्ग, त्यामध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण असे आरक्षणाचे प्रवर्ग होते. 

त्या महापालिकेमध्ये याआधी कोणतं आरक्षण झालेलं आहे, ती  चिठ्ठी बाजूला करुन उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.

या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकताना सर्वांना दाखवल्या गेल्या,  त्यानंतर पारदर्शक असणाऱ्या बॉक्समध्ये त्या टाकल्या गेल्या. 

त्या सर्व चिठ्ठ्या एकत्र केल्यानंतर त्यातून एक-एक चिठ्ठी बाहेर काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 

त्यानंतर पुन्हा 50 टक्के महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या  टाकून महिला आरक्षण काढण्यात आलं. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button