Amaravti GraminLatest News

भातकुली अतिशय क्षेत्रात दिगंबर जैन महासमितीचा विदर्भस्तरीय पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न


भातकुली (प्रतिनिधी): श्री दिगंबर जैन महासमितीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन आणि विदर्भ कार्यकारिणीचा भव्य पदग्रहण सोहळा रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी अतिशय क्षेत्र आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, भातकुली येथे समाजबांधवांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला.

धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात

दिवसभराच्या या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भक्तांबर विधान आणि भगवान आदिनाथांच्या अभिषेक पूजनाने झाली. त्यानंतर दीप प्रज्वलनाने मुख्य अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासमितीचे अध्यक्ष सुनील जैन पेंढारी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र तोरावत, प्रशांत मानेकर, महेंद्र जैन वाडी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रमांचा संकल्प

विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या भाषणात समितीच्या भविष्यातील कार्याचा आराखडा मांडला. अल्पसंख्याक योजनांची माहिती देणे, महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, गोसेवा, संस्कार शिबिरे आणि रुग्णांना मोफत भोजन व घरपोच औषधी सेवा पुरविणे, अशा विविध लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार

या सोहळ्यात अमरावती महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रीती हर्षल रेवणे आणि कारंजा नगर परिषदेच्या सौ. वर्षा भेलांडे यांचा भावपूर्ण सत्कार सुनील पेंढारी व अभिनंदन पेंढारी यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शन

अध्यक्ष सुनील जैन पेंढारी यांनी युवा पिढीसाठी ठिकठिकाणी ‘विशुद्ध सागरजी महाराज पाठशाळा’ सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच ६ फेब्रुवारी रोजी नाशिक येथील ‘णमोकार तीर्थ’ महामस्तकाभिषेक महोत्सवास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

कार्यक्रमाचे संचालन दिलीप शिवणकर यांनी केले तर आभार विनय सावरकर यांनी मानले. या सोहळ्यासाठी संपूर्ण विदर्भातून जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button