AmravatiLatest NewsSocial News

मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – डॉ. के.बी. नायक

विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांची मतिमंद मुलांच्या शाळेला शैक्षणिक भेट

               मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनासोबतच समाजानेही सक्रीय भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. के. बी. नायक यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून अमरावती शहरातील निवासी मतिमंद मुलांच्या शाळेला भेट दिली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
               डॉ. नायक यांनी मतिमंद मुलांसाठी विशेष योजना राबविण्याची आवश्यकता असून त्यांच्या शिक्षण, आरोग्य, पुनर्वसनासाठी अधिक व्यापक धोरणांची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे नमूद करुन मतिमंद मुलांच्या विविध समस्यांसंदर्भात संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यापीठ स्तरावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे असून त्या माध्यमातून मतिमंद मुलांच्या विकासाकरिता नवीन संधी उपलब्ध करून देता येतील, जेणेकरुन अशा विद्याथ्र्यांना समाजामध्ये प्रतिष्ठेने जीवन जगण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
                शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश धुमाळे  यांनी मतिमंद मुलांना भेडसावणा-या विविध शैक्षणिक, मानसिक व सामाजिक समस्यांची माहिती उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना दिली. तसेच शाळेतील अध्यापकांनी वस्तीगृह व शाळेमधील सुविधांची माहिती दिली. याप्रसंगी विभागाच्या विद्याथ्र्यांनी मतिमंद विद्याथ्र्यांसोबत नृत्य, गाणे यांसारखे मनोरंजनात्मक उपक्रम राबवून शाळेतील मुलांचा आऩंद व्दिगुणित केला. त्याचबरोबर विद्याथ्र्यांना फळ व खाऊचे वाटप करण्यात आले. ही शैक्षणिक भेट विद्याथ्र्यांसाठी सामाजिक जाणीव वाढविणारी व मतिमंद मुलांच्या जीवनातील अडचणी समजून घेण्यास उपयुक्त ठरली.
               शाळा व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले. संचालन संशोधक विद्यार्थीनी निर्मल काळबांडे, तर आभार डॉ. रोहिणी देशमुख यांनी मानले. याप्रसंगी समाजशास्त्र विभागातील डॉ.के.यु. राऊत, डॉ. प्रशांत भगत, डॉ. रोहिणी देशमुख, प्रा.साधना इंगोले, प्रा. सुनिता इंगळे,संशोधक विद्यार्थी राजकुमार सरयाम,  रमेश पवार, गोपाल वानखडे, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रवीण गडलीनकर, प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक श्री नारायण  पवार तसेच शिक्षकवृंद श्री अनिल वाळके, कु. श्रध्दा काळबांडे, प्रेरणा बाहे, श्री निखिल बारबुध्दे, श्री विशाल शिवाने, श्री मुकुंद बडगे, श्री अजय कराड, कु. ज्योती कळसकर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button