AmravatielectionLatest News
विद्यापीठाला 15 जानेवारी रोजी मतदानामुळे सुट्टी, सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग राहणार बंद

अमरावती : – महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत व दि. 15 जानेवारी, 2026 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या परिपत्रकान्वये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून सदर दिवशी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग बंद राहतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी कळविले आहे.



