AmravatielectionLatest Newspolitics

अमरावतीचा महापौर भाजपाचाच होणार – प्रवीण पोटे

अमरावती

अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपाचाच महापौर आणि उपमहापौर निवडून येणार असल्याचा ठाम दावा भाजप नेते व माजी आमदार प्रवीण पोटे यांनी केला आहे. दसरा मैदानावर झालेल्या जाहीर सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपाला कोणत्याही कुबड्यांची गरज नसून, पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

प्रवीण पोटे म्हणाले की, अमरावती महापालिकेत यापूर्वीही भाजपाचे वर्चस्व राहिले असून, आगामी निवडणुकीतही हेच चित्र दिसून येईल. शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

अमरावती शहरासाठी २४ तास पाणीपुरवठा करण्याचा भाजपाचा संकल्प असून, त्यासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती पोटे यांनी दिली. जलापूर्तीच्या कामांमुळे शहरातील पाणीटंचाई कायमची दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले. अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत असून, महापौर व उपमहापौर हे दोन्ही पदे भाजपाकडेच राहतील, असा ठाम विश्वास प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button