अमरावती महानगरपालिका निवडणूक : बडनेरा झोन २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रचार कार्यालयाचा उत्साहात उद्घाटन

अमरावती
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडनेरा झोन क्रमांक २२ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले.
अबुल कलाम आझाद चौक, बडनेरा येथे ढोल–ताशांच्या गजरात आणि शिवजयंतीच्या प्रेरणेत हा उद्घाटन सोहळा पार पडला. आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, तर आमदार संजय खोडके यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
उद्घाटनापूर्वी आमदार खोडके दाम्पत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जल्लोषात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोशनी वैभव नंदागवळी, अ. अक्रम अब्दुल अहद,
अब्दुल मजीद शेख महमूद, ईसरत बानो मन्नान खान यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार संजय खोडके म्हणाले की, बडनेरा झोनमधील विकास, नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठोस व प्रभावी काम करेल. नागरिकांच्या विश्वासावर पक्ष खरा उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोहेबुद्दीन यांनी केले. या उद्घाटनामुळे बडनेरा झोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



