AmravatielectionLatest Newspolitics

अमरावती महानगरपालिका निवडणूक : प्रभाग १९ साईनगरमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराचा भक्तिमय शुभारंभ

अमरावती

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक १९, साईनगरमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराचा आज भक्तिमय आणि उत्साहात शुभारंभ पार पडला.

माजी खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते साई मंदिरात नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन ओंकारराव भेंडे, उदय गुलाब पर्वतकर तसेच पक्ष समर्थित उमेदवार गौरी अमोल इंगळे आणि सरिता सौरभ मालानी यांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान “युवा स्वाभिमान पक्ष जिंदाबाद”, “पाना–पाना, विकासाचा बाणा” अशा घोषणांनी संपूर्ण साई मंदिर परिसर दुमदुमून गेला. महाआरतीनंतर उपस्थित नागरिकांना संबोधित करताना माजी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात विकासाची मजबूत पायाभरणी झाली असून हीच विकासाची गती पुढे नेण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सज्ज आहेत.

दरम्यान, उमेदवारांनीही नागरिकांशी थेट संवाद साधत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाला प्रभागातील हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button