AmravatielectionLatest News

विद्यापीठ कर्मचारी संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 1 फेब्राुवारी रोजी मतदान व मतमोजणी

अमरावती (दि. 03.01.2026)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक अधिकारी ऋतुराज दशमुखे यांनी जाहीर केला आहे. 1 फेब्राुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान व 2 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल घोषित होणार आहे. विद्यापीठाच्या विद्या विभागातील श्री संजय ग. खोब्राागडे व श्री मोहन नि. इंगळे यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
               घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार, प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे दि. 16 जानेवारी, मतदार यादीवरील आक्षेप नोंदविणे दि. 19 जानेवारी, अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे दि. 16 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता, नामांकन अर्जांची विक्री दि. 20 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत व 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत, नामांकन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. 21 जानेवारी रोजी कर्मचारी भवन येथे सायंकाळी 5 वा. पर्यंत, नामांकन अर्जांची छाननी दि. 21 जानेवारी रोजी कर्मचारी भवन येथे 6.15 पर्यंत, पात्र उमेदवाराची घोषणा दि. 21 जानेवारी रोजी छाननी नंतर लगेच, पात्र उमेदवारांची पदनिहाय यादी प्रसिध्द करणे दि. 22 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत व निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता, तर 1 फेब्राुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विद्यापीठातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह येथे मतदान व त्याच दिवशी दुपारी 2 वाजतापासून मतमोजणीनंतर लगेचच निकाल घोषित करण्यात येईल. तरी सर्व सभासदांनी या निवडणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक अधिकारी श्री ऋतुराज दशमुखे यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button