अ.भा. आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 02.01.2026)- भारथीदासन युनिव्र्हसिटी, पलकालैपेरुर, तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथे 14 ते 17 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, आसेगांव पूर्णाचा सौरभ राखुंडे, भूषण गायगोले व प्रफुल्ल पचारे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा पवन चुटे व यश रंगारी, मानव स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, व्याळाचा श्रेयस देशमुख, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराचा ओम लंगोटे व रुपेश ठाकरे, श्री आर.आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालय, मोर्शीचा क्रिश कांबळे, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचा साहील राऊत व ऋषिकेश घोडेस्वार, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा मोरे·ार महल्ले, स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोडचा क्रिश जयस्वाल व तिलक तिवारी, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा ज्ञानेंद्र प्रताप याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. पुरुष व महिला चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथे 02 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



