AmravatielectionLatest News

अमरावतीत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 नुसार आदेश जारी

अमरावती, 29 डिसेंबर 2025 (जिमाका):
जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक आणि नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करण्याची शक्यता आहे. अशावेळी सभांचे आयोजन व मिरवणुका होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक ठरते.

यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सर्व पोलीस ठाणेदार, अंमलदार आणि अधिकाऱ्यांना 10 जानेवारी 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

मुख्य सूचना व उपाययोजना:

  • मिरवणुका सुरळीत चालू राहतील यासाठी रस्त्यावर बंदोबस्त ठेवला जाईल.
  • उपासनास्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार असल्यास अडथळा होऊ न देण्याची काळजी घेण्यात येईल.
  • सर्व सार्वजनिक रस्ते, धाबे, सार्वजनिक जागा याठिकाणी बंदोबस्त राहील.
  • वाद्य, ध्वनिक्षेपक आणि सार्वजनिक ठिकाणी आवाज नियंत्रण याबाबत नियमांचे पालन सुनिश्चित केले जाईल.
  • सक्षम अधिकाऱ्यांनी पोलीस अधिनियम कलम 33, 35, 37 ते 40, 44 आणि 45 अन्वये कार्यवाही करावी.

जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन सर्व प्रकारच्या संभाव्य अडचणींसाठी सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button