विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय येथे शिक्षक विकास कार्यक्रमाचे आयोजन

अमरावती (दि. 22.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त 23 ते 29 डिसेंबर दरम्यान ‘शिक्षकांचा सर्वांगीण विकास’ या विषयावर सात दिवसीय अल्पकालीन शिक्षक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचा समारोप सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 2:00 वाजता आभासी पध्दतीने होईल. समारोपीय समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिगंबर गंजेवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समन्वयक श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. राऊत सचिव डॉ. ए. पी. ठाकरे, डॉ. एस. आर. बिहाडे तसेच विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत, पदव्युत्तर शिक्षण विभागप्रमुख डॉ. प्रणव कोलते, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारीवृंद परिश्रम घेत आहेत. तरी सर्वसंबंधितांनी या कार्यक्रमाला मोठ¬ा संख्येने उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.



