निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या हिवाळी-2025 14 ते 16 जानेवारी पासून सुरू होणा-या लेखी परीक्षा पुढे ढकलल्या

विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि.19.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. तथापि राज्यात आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे 14, 15 व 16 जानेवारी, 2026 पासून सुरू होणा-या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून 14 जानेवारी रोजीच्या परीक्षा 27 जानेवारीपासून, 15 जानेवारी रोजीच्या परीक्षा 28 जानेवारी व 16 जानेवारी रोजीच्या परीक्षा ह्रा 29 जानेवारी पासून होतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



