AmravatiLatest Newspolitics

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल डॉ मनीष गवई यांनी केले केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले समवेत अभिनंदन

अमरावती : देशभरातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणाऱ्या आणि प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या श्रीनगरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्षपदी भारत सरकारचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ मिलिंद कांबळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष शंकरराव शोभा गवई यांनी केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले समवेत त्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांनी देखील डॉ कांबळे यांना शुभेच्छा देऊन स्वागत केले.

विशेष म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) चे संस्थापक आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) जम्मूचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्याकडे  महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) श्रीनगरच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.गेल्या दहा वर्षांपासून मिलिंद कांबळे हे IIM जम्मूच्या अध्यक्षपदाची यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली IIM जम्मूचा नवीन कॅम्पस वेगाने आणि भक्कम पद्धतीने विकसित होत आहे. यासोबतच ते भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.उद्योग क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही मिलिंद कांबळे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.अनेक होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध पातळ्यांवर त्यांच्याकडून योगदान दिले जात आहे. आयआयएम जम्मू नंतर आता एनआयटी जम्मूच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे आल्यामुळे एनआयटीच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण घेतले जातील. डॉ. मिलिंद कांबळे यांनी आपल्याला ही नवीन जबाबदारी दिल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती आणि शिक्षण मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यांच्या या नियुक्तीसाठी  अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांनी  त्यांचे विशेष अभिनंदन केले असून डॉ. मिलिंद कांबळे यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची नियुक्ती होणे ही शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन  डॉ. गवई  यांनी केले  त्यांच्या नेतृत्वाखाली NIT श्रीनगरसाठी नवीन अध्याय सुरू झाला आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांनी देखील डॉ कांबळे यांना विशेष शुभेच्छा देऊन स्वागत अभिनंदन केले. मिलिंद कांबळे हे यशस्वी  उद्योजक असून  २०१३ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button