AmravatiLatest NewsMaharashtra Politics
अमरावती मनपा निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार; संजय खोडके यांची घोषणा

अमरावती – अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप किंवा शिंदे गटासोबत कोणतीही युती नसल्याचे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते संजय खोडके यांनी केली.
संजय खोडके यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व २२ प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे करणार असून पक्षाची निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात आहे. शहरातील जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा निर्धार केल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवे बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



