विद्यापीठाच्या आचार्य पदवी प्रवेशास … मुदतवाढ अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

अमरावती (दि. 17.12.2025) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आचार्य पदवी प्रवेशाची अधिसूचना यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली आहे. तथापि विनंतीवरुन प्रवेशाच्या तारखेत मुदतवाढ देण्यात येत असून सुधारित वेळापत्रकानुसार महाविद्यालयात/संशोधन केंद्रात 31 मार्च, 2026 पर्यंत उमेदवारांना प्रवेशित होता येईल. ऑनलाईन एन्रोलमेंट अर्ज दि. 1 ते 15 एप्रिल, 2026 पर्यंत, पीएच.डी. कोर्स वर्क दि. 16 एप्रिलपासून, तर पोर्टलवर गुण/क्रेडिटस् भरण्याची तारीख 1 ते 10 ऑगस्ट, 2026, कोर्स वर्क पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे 15 ऑगस्ट पर्यंत आणि विद्यापीठास सिनॉप्सिस सादर करण्याची तारीख 16 ते 31 ऑगस्ट, 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे.
निदेश क्र. 41/2025 नुसार ज्या संशोधन केंद्रांमध्ये इतर महाविद्यालयातील मार्गदर्शक रुजू असतील त्यांना नवीन संशोधक विद्याथ्र्यांना नोंदणी करुन घेता येणार नाही, याची दक्षता महाविद्यालय व संशोधन केंद्रांना घ्यावयाची आहे. जर नोंदणी केल्यास ती कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालय/संशोधन केंद्रांची राहील, याची संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.
महाविद्यालय/संशोधन केंद्रांना सूचित करण्यात येते की, नामांकन पूर्ण झालेल्या विद्याथ्र्यांची कोर्स वर्क करिता नोंदणी करण्यात यावी. नामांकन न झालेल्या विद्याथ्र्यांचे कोर्स वर्क पूर्ण झाले तरी सुध्दा त्यांची नोंदणी करुन घेवू नये, ती रद्द करण्यात येईल व याची जबाबदारी महाविद्यालय/संशोधन केंद्रांची राहील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी कळविले आहे.



