पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती : पारूल युनिव्र्हसिटी, वडोदरा (गुजरात) येथे 05 ते 11 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हाचा ऋतिक अतकर, प्रज्योत तायडे व ओम काशिकर, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा राज मिश्रा, दुकीवाकोरही, ओमहांग सुब्बा, झाकीएसटुओ केट्स, राहुल कुमार, पालडेन धोंडुप, अफर्मिंग तलंग व सोनम तमंग, दयाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळचा मोर्विन मोसेस, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा साहिल बेनिवाले, सुफियान अब्दुल व फैझल शेख, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा ओम धारव, मुस्तफा शेख, इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगांवचा अभिषेक बुटके व यश यादव, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा रोमान खान, रियाज चौधरी व तुषार लोखंडे, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा रफिक खान, जवाहरलाल दर्डा इन्स्टिट¬ुट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळचा कैवल्य राठोड आणि श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा निखिल गोंडे याचा समावेश आहे.
निवड झालेल्या संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 24 डिसेंबर, 2025 ते 02 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



