AmravatiLatest NewsSocial News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय फ्रेजरपुरा, अमरावती येथे आज दि. 06/12/2025 शनिवार रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. प्रवीण घोंगडे सर, मुख्याध्यापिका खरबडे मॅडम, श्री. उमाळे सर, श्री. गवई सर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री. गवई सर, खरबडे मॅडम, श्री. उमाळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण घोंगडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपली गाणे, भाषणे सादर केली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



