India NewsLatest News
मानवीय आधारावर सरकारची सुप्रीम कोर्टात सहमती : गर्भवती महिला व मुलाला बांगलादेशातून परत आणणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मानवीय कारणास्तव बांगलादेशात परत पाठवण्यात आलेल्या गर्भवती महिला सोनाली खातून आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला पुन्हा भारतात आणण्यास सहमती दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर बुधवारी (३ डिसेंबर २०२५) केंद्राने ही भूमिका मांडली.
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारची ही हमी न्यायालयीन आदेशात नोंदवली. केंद्राने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, सोनाली खातून यांना त्यांच्या आरोग्यस्थितीच्या अनुषंगाने मोफत वैद्यकीय सेवा आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
न्यायालयाने अधिकाऱ्यांना आदेश दिले की, महिलेसोबत तिच्या आठ वर्षांच्या मुलाचीही दैनिक काळजी घेतली जावी. याप्रकरणी पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही केंद्राला देण्यात आले आहेत.



