electionLatest NewsMaharashtra Politics

राज्यातील 20 नगरपालिकांमधील निवडणुकाला लागलाय ब्रेक, निवडणूक आयोगाने जाहीर केले सुधारित निवडणूक कार्यक्रम

काही जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीची निवडणूक तर काही ठिकाणी एक दोन प्रभागातील निवडणुकांना ब्रेक लागलाय. यामध्ये पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी सुधारित कार्यक्रमही जाहीर केलाय. त्यानुसार आता पुढे ढकललेल्या नगरपालिकांसाठी 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी होईल. राज्यात 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचा प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने रविवारी राज्यभर राजकीय नेत्यांकडून सभांचा धडाका पाहायला मिळाला.

कुठे कुठे निवडणुका लांबणीवर?
👉 बारामती
👉 फलटण
👉 महाबळेश्वर
👉 दिग्रस
👉 पांढरकवडा
👉 वणी
👉 मंगळवेढा
👉 कोपरगाव
👉 देवळाली
👉 नेवासा
👉 पाथर्डी
👉 घुग्गुस
👉 अंजनगाव सुर्जी
👉 रेणापूर
👉 अंबरनाथ
👉 मुखेड
👉 धर्माबाद
👉 वाशिम
👉 रिसोड
👉 बाळापूर

तांत्रिक चुकांसह उमेदवारांविरोधात कोर्टात अपील असल्याने या निवडणुका पुढे ढकलल्याचं सांगितलं जातंय. अहिल्यानगरमध्ये 4 नगराध्यक्ष आणि 7 नगरसेवकपदांच्या उमेदवारांविरोधात कोर्टात अपील आहे. धाराशिव नगरपालिकेत तीन प्रभागात हेच चित्र आहे. बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

कसं आहे नवं वेळापत्रक?
👉 नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत- 10 डिसेंबर
👉 चिन्ह वाटप आणि अंतिम यादी 11 डिसेंबर
👉 मतदान- 20 डिसेंबर
👉 मतमोजणी-21 डिसेंबर
👉 23 डिसेंबरला संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार

कुठे-कुठे नगरपरिषदेच्या निवडणुकींना स्थगिती?
अमरावती – अंजनगाव सुर्जी (नगरपरिषद निवडणूक)
अकोला – बाळापूर नगरपालिका
अहिल्यानगर – कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी (नगरपरिषद निवडणूक)
सातारा – फलटण , महाबळेश्वर (नगरपरिषद निवडणूक)

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button