AmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चा नारा फक्त दिखावा?जावेद नगर परिसरातील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त; महिन्यांपासून परिस्थिती जैसे थे

अमरावती शहराला स्वच्छ हवेशी जोडून पाहिले जाते; परंतु वास्तवात शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेची स्थिती गंभीर आहे. पश्चिम अमरावतीतील मुस्लिम बहुल प्रभाग क्र. 16 मधील जावेद नगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याचा प्रचंड त्रास होत असून नागरिक संतप्त आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेचे कचरा कंटेनर नियमितपणे याच ठिकाणी रिकामे केले जात असल्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून ये-जा करणाऱ्या महिला, पुरुष आणि लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे.

अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी देऊनही परिस्थितीत काहीच बदल झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारवाया केल्या गेल्याचा दावा केला जातो, मात्र त्या केवळ फोटोसेशनपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत, असा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

परिसरातील रहिवाशांचा प्रश्न स्पष्ट आहे—
“स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती” हा नारा फक्त कागदोपत्रीच राहणार का? की महानगरपालिका प्रत्यक्षात मैदानात उतरून काम करणार?”

जावेद नगर परिसरातील वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button