AmravatiEducation NewsLatest News

गो. से महाविद्यालयात “मेड सेफ्टी-2025” कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

खामगाव :- स्थानिक गो. से महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद, औषध माहिती केंद्र व गो. से. महाविद्यालय, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “Med Safety Week-2025” या उपक्रमांतर्गत Medicines Safety for Our community या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमांस मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर हे उपस्थित होते. तर मंचावर विराजमान प्रमुख वक्ते म्हणून श्री.उमेश इंगळे व श्री. विजय दवंगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. कोमल काळे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगितले व प्रमुख अतिथीं यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री. उमेश इंगळे (समन्वयक- महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद & अध्यक्ष – संग्रामपूर तालुका केमिस्ट & ड्रजिस्ट असोसिएशन) यांनी चुकीच्या पद्धतीने केलेला औषधोपचाराचे परिणाम, स्वतःहून घेतलेली औषधे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याविना वापरलेले औषध उपचार अनेकदा गंभीर परिणाम घडवू शकतात असे सांगितले. तर रुग्णाने योग्य औषध, योग्य मात्रा, योग्य वेळी आणि योग्य मार्गाने औषध घेणे अत्यावश्यक आहे असे सुचविले. तसेच रुग्णांनी डॉक्टर व फार्मासिस्ट यांचा सल्ला पाळणे, औषधांचे लेबल नीट वाचणे, जुन्या प्रिस्क्रिप्शनचा पुनर्वापर टाळणे व औषधांचे दुष्परिणाम ओळखणे अशा विविध बाबीवर वक्त्यांनी भाष्य केले. तसेच श्री. विजय दवंगे (समन्वयक- महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद & कार्यकारी सदस्य – बुलढाणा जिल्हा केमिस्ट & ड्रजिस्ट असोसिएशन)यांनी औषधाची प्रक्रिया व सामान्य व्यक्तीने औषध कोणत्या पद्धतीने वापरावे यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबामध्ये व समाजामध्ये औषध व औषधाची जनजागृती करून औषधाच्या दुष्परिणामाविषयी जागृत राहावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. तळवणकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. नीता बोचे, प्रा. सुहास पिढेकर, प्रा. कोकाटे, प्रा. शर्मा यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन कु. राजनंदिनी राठोड  यांनी केले. तर मान्यवरांचे आभार प्रा. उमेश खंदारे यांनी मानले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button