Accident NewsIndia NewsLatest News

सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघात, 5 जण जागीच ठार, 8 गंभीर

शनिवारी सकाळी सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग भयानक अपघात झाला आहे. अपघातात 5 जण जागीच ठार झाले, तर, 8 जण गंभीर जखमी झाले आहे. वाहनाचे टार फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धाराशिवमधील अणदूर परिसरात त्यांच्या जीपच टायर्स अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली. देव दर्शनासाठी निघालेल्या भविकावंर काळाने घाला घातला आहे. सर्वजण एकाच वाहनातून देवदर्शनासाठी जात होते. क्रुजर जीपचा टायर फुचून हा अपघात झाला आहे.

या धडकेमुळे जीपमध्ये बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जीपच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. जीप पलटी झाल्याने मृतदेह त्याच्याखाली अडकले होते. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जीप बाजूला करुन मृतदेह बाहेर काढले. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये सात ते आठजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समजते. अपघाताच्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते अशी देकील माहिती समोर येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button