सीन्नो बायोटेक कंपनीमध्ये विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या विद्याथ्र्यांची निवड

अमरावती (दि.21.11.2025) – नवी मुंबई येथील रेसीन्नो बायोटेक प्रा. लि. कंपनीमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या दोन विद्याथ्र्यांची कंपनीने निवड केली आहे. विशेष म्हणजे रेसीन्नो बायोटेक प्रा. लि. ही कंपनी विद्यापीठाच्याच माजी विद्याथ्र्यांनी उभारलेली कंपनी आहे. माजी विद्यार्थी डॉ. काफील अहमद यांनी 2018 मध्ये या कंपनीची उभारणी केली. संशोधन आणि नावीन्यवादी तंत्रज्ञानावर आधारित सदर कंपनी मानवी व पशूवैद्यकीय रोग निदानासाठी कार्य करते.
कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यापीठात 20 विद्याथ्र्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून दोन विद्याथ्र्यांची प्रकल्पांसाठी निवड केली. विद्यापीठाने उद्योगांशी सामंजस्य वाढवून विद्याथ्र्यांना रोजगार व अनुभव प्रदान करण्यासाठी उचललेले हे महत्वाचे पाऊल असून भविष्यात विद्याथ्र्यांना याचा मोठा लाभ होणार असल्याचे मानले जाते. बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी कंपनीच्या प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून विद्यापीठाच्यावतीने सत्कार केला.



