Uncategorized

विद्यापीठात संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी व्याख्यानमालेचे आयोजनडॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचा उपक्रम

अमरावती (दि.21.11.2025) –
               संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने दि. 26 नोव्हेंबर, 2025 रोजी संविधान दिनानिमित्त दुपारी 3.30 वाजता विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्र सभागृहामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘संवैधानिक मूल्यांसमोरील 21 व्या शतकातील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे अॅड. श्रीकिशन मोरे हे व्याख्यान देणार आहेत. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी उपस्थित राहणार आहेत.
               व्याख्यान कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button