BuldhanacitynewsLatest News

मुख्याध्यापक दारूच्या नशेत शाळेत धिंगाणा; ग्रामस्थांचा शिक्षण विभागाकडे कारवाईचा धडक निषेध

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मेहकर पंचायत समिती अंतर्गत मोहोना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे यांनी दारूच्या नशेतच शाळेत पोहोचत विद्यार्थ्यांसमोर धिंगाणा घातला.

शुक्रवारी सकाळी शाळेत प्रार्थना सुरू असताना मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आले व विद्यार्थ्यांसमोर अव्यवस्थित वर्तन करत गोंधळ घातला. या घटनांचे काही पालकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले असून काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या घटनेनंतर ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकी पेशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या प्रकारावर ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मुख्याध्यापक कांबळे यांना निलंबित करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

घटनेनंतर शाळेत घबराट आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

मेहकर तालुक्यात ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली असून शिक्षण विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button