Uncategorized

अमरावतीचे सुपुत्र डॉ मनीष गवई यांच्या पुढाकारने दिल्लीत राष्ट्रीय सविधान सन्मान दिवसाचे भव्य आयोजन व संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन

अमरावतीच्या गणमान्य व्यक्तींना करणार सन्मानितअमरावतीकराना राष्ट्रपती भवन पाहण्याची संधी

अमरावती : 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात राष्ट्रीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान देशाला समर्पित केले. या ऐतिहासिक दिनानिमित्त अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष शंकरराव शोभा गवई यांच्या पुढाकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून या समारंभामध्ये अमरावतीच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून  या सर्व मान्यवरांना राष्ट्रपती भवन देखील पाहण्याची सुवर्ण  संधी प्राप्त होणार  आहे

संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने राज्यघटनेचा स्वीकार केला होता. हा दिवस नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली संविधान तयार झाले आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे हा महान ग्रंथ भारताचा पाया बनला संविधानाची निर्मितीमुळे स्वतंत्र भारताचा पाया रचला गेला. हा दस्तऐवज केवळ सरकारची रचनांचीच व्याख्या नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या आशा, स्वप्ने आणि आकांक्षा यांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांनुसार मूर्त रूप देतो. आपली राज्यघटना विकसित होत असलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक वातावरणाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीचे मार्गदर्शन करत आहे.त्यानिमित्ताने अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष शंकरराव शोभा गवई यांच्या पुढाकारने दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय सविधान सन्मान दिवसाचे भव्य आयोजन करण्यात येणार असून या समारंभामध्ये अमरावतीच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे  विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे करणार असून याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री श्री. दुर्गादास उईकेजी हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून  डॉ. सत्यनारायण जटियाजी माजी सामाजिक न्याय  मंत्री  भारत सरकार व् भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डचे सदस्य,श्रीमती मीनाक्षी लेखीजी, माजी परराष्ट्र आणि संस्कृती राज्यमंत्री भारत सरकार ,श्री हंसराज गंगाराम अहिरजी,अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग भारत सरकार,श्री इक्बाल सिंग लालपुरा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष भारत सरकार, श्री लव कुश कुमार,सदस्य राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार, माननीय डॉ. जानिस दरबारी भारतातील माँटेनेग्रोचे मानद कौन्सिल जनरल यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन संविधान पूजनाने करण्यात येणार असून याप्रसंगी संविधानाचे दिल्लीत सामूहिक वाचन देखील करण्यात येणार आहे या राष्ट्रीय संविधान सन्मान कार्यक्रमाप्रसंगी अमरावती जिल्ह्यातील गणमान्य सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात येणार आहे आणि या सन्मान कार्यक्रमानंतर अमरावतीकराना राष्ट्रपती भवनामध्ये भेट देण्याची सुवर्णसंधी देखील प्राप्त होणार असून  याप्रसंगी अखिल भारतीय आंबेडकरी प्रबोधन कला मंचचे देखील राष्ट्रीय सतरवर उद्घाटन करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाचे आयजन अमरावतीचे सुपुत्र डॉ मनीष गवई  यांच्या पुढाकारने  करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अधिक माहिती करिता ९३७०१००८९८  या क्रमांकावर संपर्क साधावा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button