संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील गोपनीय विभागाच्या सभागृहाचे नूतनीकरणकुलगुरूंचे हस्ते सभागृहाचे उद्घाटन

अमरावती – (दि. 20.11.2025)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गोपनीय विभागाचे नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते नुकतेच फित कापून करण्यात आले. विद्याथ्र्यांच्या हितासाठी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामांना गती मिळावी, या उद्देशाने हे नूतनीकरण करण्यात आले आहे. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे, न.न.सा. संचालक डॉ. अजय लाड, मूल्यांकन अधिकारी प्राचार्य डॉ. श्रीप्रभु चापके, कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे, उपकुलसचिव सौ. मोनाली तोटे पाटील, उपकुलसचिव सौ. मिनल मालधुरे, उपकुलसचिव श्री विक्रांत मालवीय, डॉ. प्रशांत गावंडे, गोपनीय विभागाचे सहा. कुलसचिव डॉ. विरेंद्र निमजे, अधीक्षक कु. जयश्री खंडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले, सहा. कुलसचिव श्री जयकुमार भडके, तसेच परीक्षा व गोपनीय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नूतनीकरणाचा फायदा
नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहात केंद्रीय मूल्यांकन कार्यक्रम समिती, परीक्षेतील गैरव्यवहार तपासणी समिती, परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणांची पडताळणी समिती, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींनी गठित केलेल्या समित्यांच्या बैठका तसेच गोपनीय व परीक्षा विभागातील इतर समित्यांच्या बैठका आदी महत्वाचे कामकाज पार पडणार आहे. या माध्यमातून विद्याथ्र्यांच्या हिताकरीता विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे.



