Uncategorized

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात 1 ते 10 फेब्राुवारी दरम्यानअ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष व महिला) स्पर्धेचे आयोजन

देशभरातील 52 विद्यापीठांचे खेळाडू घेणार सहभाग


अमरावती :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत व असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्र्हसिटीजच्यावतीने   अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा-2025-26 चे अमरावती शहरातील प्रसिध्द श्री शिवाजी शिक्षण संस्थाव्दारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे 1 ते 10 फेब्राुवारी, 2026 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणा-या या स्पर्धेमध्ये देशभरातील 52 विद्यापीठांचे हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत. पुरुष संघाच्या स्पर्धा दि. 1 ते 5 फेब्राुवारी व महिला संघाच्या स्पर्धा दि. 6 ते 10 फेब्राुवारी दरम्यान होणार आहेत.
               संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्यावतीने सर्व स्पोर्ट कमिटी, कौन्सिल, विद्यापीठ तसेच संस्थांच्या पदाधिकारी यांना पत्राव्दारे कळविले असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत यावर्षीच्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धा शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात होत असल्याने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख तसेच सर्व कार्यकारिणी मंडळाचे अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button