विद्यापीठाच्या धनुर्विद्या, ज्युदो, बॉÏक्सग स्पर्धेत पात्र खेळाडूंची ‘खेलो इंडिया-2025’ स्पर्धेकरिता निवड

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या खेळाडूंनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्राविण्य मिळवून केलेल्या खेळ प्रदर्शनाच्या आधारे धनुर्विद्या, ज्युदो व बॉÏक्सग स्पर्धेतील खेळाडूंची ‘खेलो इंडिया-2025’ स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. धनुर्विद्या (पुरुष व महिला) स्पर्धा साई जगतपुरा आर्चरी रेंज, जयपूर, येथे 24 ते 28 नेव्हेंबर, ज्युदो (पुरुष) स्पर्धा उदयपूर येथे दि. 25 ते 28 नोव्हेंबर व बॉÏक्सग (महिला) स्पर्धा इंडोअर हॉल लोहगड स्टेडियम, भरतपूर येथे दि. 01 ते 05 डिसेंबर, 2025 दरम्यान होणार आहे.
धनुर्विद्या (पुरुष) चमूंमध्ये विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारचा हिमांशु चरडे, गुलामनबी आझाद महाविद्यालय, बार्शी टाकळीचा सुरज खानझोडे व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदराची कु. रिध्दी पोटे यांचा समावेश आहे. ज्युदो (पुरुष) चमूमध्ये बी.बी. कला, एन.बी. वाणिज्य व बी.पी. विज्ञान महाविद्यालय, दिग्रसचा साबीर चव्हाण याचा समावेश आहे. तर बॉÏक्सग (महिला) चमूमध्ये श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. पुनम कैथवास व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. विधी रावल हिचा समावेश आहे.
निवड झालेल्या सर्व चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.



