AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra
हा लढा आमचाच आहे, कुणीही हस्तक्षेप करू नये – सोनाबाई

४ नोव्हेंबर रोजी राजापेठ बसस्थानकाजवळ दोन तृतीयपंथी गट — आम्रपाली गट आणि सोनाबाई गट — यांच्यात मोठा राडा झाला. या घटनेदरम्यान मिरची पावडर फेकणे आणि तलवारीने वार करण्याचे आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शेवटी हा वाद ७ नोव्हेंबर रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर सोनाबाई गटाने सिटी न्यूजच्या माध्यमातून अमरावतीकरांना थेट आवाहन केले की, “हा लढा फक्त तृतीयपंथीयांचा आहे. यात कोणतीही संघटना, राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिकांनी सहभागी होऊ नये.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, “अमरावतीकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी.”
सोनाबाई यांच्या या आवाहनानंतर या वादाला सामाजिक सौहार्द राखत मार्ग काढला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



