AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

तू माझी नाही तर कोणाची नाही!” म्हणत महिलेवर चाकूचे वार

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र कॉलनी परिसरात 7 नोव्हेंबरच्या सायंकाळी धक्कादायक घटना घडली. एका महिलेला तिच्या मुलासोबत फोटो काढण्यासाठी बाहेर पडले असताना दोन तरुण दुचाकीवर आले. अचानक या दोघांनी “तू माझी नाही तर कोणाची नाही” असं म्हणत महिलेला अडवलं आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. महिलेवर तब्बल 12 ते 13 वार करून आरोपी तिथून फरार झाले. महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत पीडित महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तिच्या नातेवाईकांनी रात्री धाव घेतली. या घटनेनंतर गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी दीपक चपरवाल आणि अंश या दोघांविरुद्ध बी.एन.एस. कलम 118(2), 3, (5) अंतर्गत गुन्हा नोंदवला. या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास गाडगेनगर पोलिस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button