आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात भीषण अपघात – कारने तीन दुचाकींना दिली धडक; तिघांचा मृत्यू, तिघे जखमी

काकीनाडा (आंध्र प्रदेश)–आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील सोमावरम गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५ रोजीकिरलमपुडी पोलिस ठाणे हद्दीत घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, विशाखापट्टणमहून राजमहेंद्रवरमकडे जात असलेल्या कारचा टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कारने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या बसथांब्यावर जाऊन आदळली, मात्र सुदैवाने तेथे त्या वेळी कोणीही उपस्थित नव्हते.
या अपघातात मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले असून, जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील महामार्गावर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. > City: 🖼 Photo



