क्राईम ब्रँचच्या धडक कारवाईत देहव्यापाराचा पर्दाफाश

नागपूर शहरातील पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भवानीनगर परिसरात भवानी मंदिराजवळील एका घरात काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.या माहितीनुसार पोलिसांनी गुप्त पद्धतीने सापळा रचत त्या घरावर छापा टाकला. तपासादरम्यान पोलिसांना अवैध देहव्यापार चालविण्याचा पुरावा मिळाला. या कारवाईत तिन महिलांना मुक्त करण्यात आलं असून, देहव्यापार चालविणाऱ्या एका महिला दलालाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तिचा एक साथीदार मात्र पोलिस येण्यापूर्वीच पसार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुक्त केलेल्या महिलांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आलं आहे. तर आरोपी महिला व फरार साथीदाराविरुद्ध पारडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.



