Latest News

भातकुलीतील शेतकरी बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चा सहभागी

भातकुली तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत… राज्यातील शेतकरी आंदोलनाला गती मिळत असतानाच, बच्चू कडू यांच्या एल्गार मोर्चाला मोठं समर्थन मिळत आहे… भातकुली तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आज नागपूरकडे रवाना झाले आहेत…
या शेतकऱ्यांचा स्पष्ट संदेश आहे — “आम्ही बच्चू कडूंच्या पाठिशी आहोत… आणि जर त्यांनी आदेश दिला तर आम्ही मंत्र्यालाही सोडणार नाही…”
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे… शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आता लढा रस्त्यावरच दिला जाईल… अमरावती जिल्ह्यातील विविध गावांमधून ट्रॅक्टर, जीप आणि बसमधून शेतकरी नागपूरच्या दिशेने निघाले आहेत…
शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष असून त्यांच्या हातात झेंडे, फलक आणि बच्चू कडूंचे पोस्टर दिसत आहेत…
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या बच्चू कडूंसोबत आहोत” असा जयघोष करत शेतकरी एल्गार मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत…
दरम्यान, प्रशासनाने या आंदोलनाकडे बारकाईने लक्ष ठेवले असून नागपूरमध्ये मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button