Uncategorized

लातूरमध्ये दिव्यांगांसाठी दीपावली किराणा किट वाटप

लातूर – लातूर शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजसेवेचा सुंदर उपक्रम राबवण्यात आला. नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्ट वाशी नई मुंबई आणि जीवनदीप फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग, अस्थिव्यंग, बौद्धिक दिव्यांग तसेच श्रावण बाधित व्यक्तींना दीपावली किराणा किट मोफत वाटप करण्यात आले. या किटमध्ये रवा, साखर, तेल, मैदा, बेसन, चुरमुरे यांसारख्या दिवाळीच्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता.
एकूण अडीचशे ते तीनशे किट गरजू दिव्यांग व्यक्तींना देण्यात आले. कार्यक्रमास औसा नायब तहसीलदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हा कार्यक्रम म्हणजे केवळ वाटप नव्हे, तर एक सामाजिक बांधिलकी आहे. दिव्यांग व्यक्तींना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांच्यासाठी अशा उपक्रमांनी त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आनंदाची ऊर्जा मिळते.”
त्यांनी पुढे असेही सांगितले की, “जीवनदीप फाउंडेशन आणि जैन ट्रस्टचे हे कार्य प्रशंसनीय आहे. इतर संस्थांनीही यांचा आदर्श घेऊन समाजकार्यात योगदान द्यावे.” सामाजिक कार्यकर्त्या संगीता चोपडा मॅडम यांनी सांगितले की “ही संस्था अनेक वर्षांपासून दिव्यांग, शैक्षणिक, आरोग्य, स्वच्छता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या वर्षीही दिव्यांगांची दिवाळी आनंदात जावी या उद्देशाने किट वाटप करण्यात आले. ही खरी सामाजिक जबाबदारी आहे आणि यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन.” कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. किट घेताना अनेक दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता,
आणि याच भावनेतून दिवाळीचा खरा अर्थ आनंद वाटणे प्रकट झाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button