AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात नवप्रवेशित विद्याथ्र्यांचा स्वागत समारंभ संपन्न , सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत

        संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात नवप्रवेशीत विद्याथ्र्यांचा परिचय व स्वागत समारंभ मोठ¬ा उत्साहात पार पडला. वरिष्ठ अभ्यासक्रमाच्या  विद्याथ्र्यांनी कनिष्ठ अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांचे उत्साहाने स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रशांत गावंडे, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. हेमंत खडके, अधिसभा सदस्य डॉ. जयंत वडतकर, रसायनशास्त्र मंडळाच्या केमिकल सोसायटीच्या प्रभारी डॉ. मनीषा कोडापे उपस्थित होते.
                 प्रमुख अतिथी डॉ. हेमंत खडके यांनी आपल्या भाषणातून विविध कविता व जीवनमूल्यांचे धडे विद्याथ्र्यांना दिले. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व सकारात्मक विचारांची गरज असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. प्रशांत गावंडे यांनी विद्याथ्र्यांना शिक्षण व संशोधनात आत्मवि·ाासाने पुढे जावे, असे सांगितले. केमिकल सोसायटीच्या अध्यक्ष प्रांजली चव्हाण, कु. रेणुका नाले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
                 सांस्कृतिक कार्यक्रमात  विद्याथ्र्यांनी दिलखुलास नृत्यप्रदर्शन, रॅम्पवॉक, हँडकरचिफ गेम, डेअर, फिशपाँड यांसारख्या खेळांनी रंगत आणली. विशेषतः फिशपाँडमधील विनोदी संदेशांनी विद्यार्थी-शिक्षक सर्वांना खळखळून हसवले. संपूर्ण विभाग रेट्रो थीम 90 च्या दशकातील बॉलिवुड शैलीत सजविण्यात आला होता. विद्याथ्र्यांनी सुध्दा खास ड्रेस कोड पाळत तसा लूक साकारला, त्यामुळे जुन्या आठवणी आणि नव्या उत्साहाचा अनोखा संगम दिसत होता. सर्वांनी एकत्रित नृत्य, खेळ आणि गप्पांचा आनंद घेतला. कनिष्ठ विद्याथ्र्यांनीही आपल्या वरिष्ठांसोबत मनमोकळेपणाने सहभाग घेतला. या मैफिलीतून विद्याथ्र्यांमधील आपुलकी आणि एकोपा अधिक घट्ट झाला. मिस फ्रेशर मस्के आणि मिस्टर फ्रेशर म्हणून कुणाल मेश्राम यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक डॉ. मनिषा कोडापे यांनी, सूत्रसंचालन स्नेहल गडदे, तर आभार अर्पिता दामले हिने मानले. कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button