रजवाडा पॅलेस समोर ई-सिगरेट घेऊन उभ्या असलेल्या युवकाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपेठ पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रजवाडा पॅलेस समोर एक व्यक्ती ई-सिगरेट घेऊन उभा आहे आणि ती विक्री करण्याच्या तयारीत आहे. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतलं. आरोपीचे नाव वासिम शेख असे असून, त्याच्याकडून विविध कंपनींच्या ई-सिगरेटचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या मुद्देमालाची एकूण किंमत ₹1,80,734 इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
ई-सिगरेटवर केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वीच बंदी घातली असून, या पदार्थांचा वापर व विक्री दोन्हीही कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.
नागपूर पोलिसांनी या कारवाईद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरात बेकायदेशीर वस्तूंची विक्री करणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही.
सध्या या प्रकरणात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.



