Uncategorized

जस किचन बारमध्ये अज्ञात व्यक्तीकडून रोख रकमेसह दारूच्या बॉटल्स लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील जस किचन बारमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात आरोपीने चोरीची घटना घडवली. बार बंद झाल्यानंतर काही वेळातच चोरट्याने मागील बाजूने प्रवेश करून कॅश काउंटरमधील रोख रक्कम, महागड्या दारूच्या बॉटल्स आणि किचनमध्ये ठेवलेला चकणा, शेंगदाणे, काजू आणि इतर खाद्यपदार्थ चोरी करून नेले. सकाळी बार उघडल्यावर कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही घटना आली आणि तात्काळ मॅनेजरला याबाबत माहिती देण्यात आली.
बारचे मॅनेजर यांनी तत्काळ पोलिसांना कळवून तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून बार आणि वाईन शॉप्सवर चोरीच्या घटनांत वाढ झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी परिसरातील संशयितांवर लक्ष ठेवून तपास सुरू केला आहे, तर जस किचन बार व्यवस्थापनाने सुरक्षा यंत्रणेमध्ये अधिक कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button