घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले अटक

दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर शहरातील झिंगाबाई टाकळी येथील आदर्श नगर इंगोले ले आउटच्या प्लॉट नं. ३७ मध्ये घडलेली ही घरफोडीची घटना खूपच धक्कादायक आहे. फिर्यादी गोपीनाथ कृष्ण राज आपल्या कुटुंबासह शेतीला गेले होते. घर बंद करून गेले असतानाच कोणीतरी आत प्रवेश करून स्वयंपाकघर व बेडरूमातील अल्मारी, कबर्ड उघडे करून सोनं व रोख रक्कम १,२०,०००/- रूपये चोरून नेली. पोलीसांनी तांत्रिक व गुप्त बातमीदारांच्या मदतीने या आरोपीवर लक्ष ठेवले आणि ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२:२२ वाजता आरोपी शेरअली उर्फ रहीम मोती सैय्यद वय २५ वर्ष, रा. इंदीरा नगर, जि. यवतमाळ, याला अटक केली.पोलीस तपासादरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. तसेच पो. ठाणे मानकापूर अंतर्गत इतर चोरीच्या प्रकरणांमध्येही आरोपीची कबुली समोर आली आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोनि (गुन्हे) अमोल इंगोले, पोउपनि बजरंग खोमणे आणि इतर पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



