Uncategorized
“गुरुकुंज मोझरी श्रद्धांजली सोहळ्यावर अमोल मिटकरींची तीव्र प्रतिक्रिया | सर्वधर्म समभावाला धोका?”

गुरुकुंज मोझरी येथे झालेल्या मौन श्रद्धांजली सोहळ्यानंतर अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली गंभीर भावना.
यंदाचा कार्यक्रम दबावाखाली झाल्याची शंका, सर्वधर्मीय प्रार्थनेचा पारंपरिक क्रम मोडल्याची खंत त्यांनी मांडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्रद्धांजली सोहळ्याला राजकीय स्वरूप न देता भावपूर्ण आणि भक्तिपूर्ण ठेवावा, अशी मागणी मिटकरींनी आयोजकांकडे केली.
त्यांनी स्पष्ट सांगितले की तुकडोजी महाराजांचे विचार हे मानवतावादी आहेत, धर्माधतेचे नव्हेत. “सर्व धर्मांच्या प्रार्थना एकत्र होणं हेच या भूमीचं सौंदर्य आहे,” असे मत त्यांनी नोंदवले.
यंदाच्या श्रद्धांजली कार्यक्रमातील काही बदल पाहून मिटकरी यांनी साठाव्या श्रद्धांजली सोहळ्यात सर्वधर्मीय एकतेचं दर्शन व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.



