Uncategorized

ऑपरेशन थंडर मोहिमे अंर्तगत MD पावडरसह आरोपी ताब्यात

नागपूर शहर पोलीस आयुक्त, रविन्द्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन थंडर – एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया’ या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई सुरू आहे. दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ५.५० वा., जरीपटका पोलीसांचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना, हाऊसिंग बोर्ड सोसायटी चौकाजवळून एका संशयीत व्यक्तीच्या MD पावडर विक्रीची खात्रीशीर माहिती मिळाली.
पोलीसांनी त्या ठिकाणी पोहोचल्यावर संशयीत व्यक्ती पोलीसांना पाहून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु ताब्यात घेतला गेला. आरोपीची ओळख सुरज अर्जुनदास मोटवानी, वय २९ वर्षे, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, जरीपटका, नागपूर असे झाली. अंगझडतीत आरोपीच्या पॅन्टच्या खिश्यातून झिपलॉक पन्नीत २.८२ ग्रॅम MD पावडर जप्त झाली, जी बाजारभावानुसार अंदाजे १२,०००/- रुपये किमतीची होती. त्याचबरोबर, १ मोबाईल फोनही जप्त करण्यात आला.
पोलीसांच्या माहितीप्रमाणे, आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी MD पावडर बाळगत होता. आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे जरीपटका येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button