Uncategorized

अमरावतीत दिवाळी आनंदोत्सवाची जोरदार तयारी! | आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी | सांस्कृतिक भवनात सोहळा

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी दरवर्षी आयोजित होणारा “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन” यावर्षी १६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज पाहणी करताना
परिसर स्वच्छ, प्रकाशमान आणि आकर्षक ठेवण्याचे निर्देश दिले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
या कार्यक्रमात स्थानिक छायाचित्रकारांची उत्कृष्ट कलाकृती,
बचत गटांचे स्टॉल्स, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, आणि
सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल.
महानगरपालिकेच्या या उपक्रमात विधिमंत्र संस्था सहसंयोजक म्हणून सहभागी होत आहे,
ज्यामुळे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.
या पाहणीवेळी उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर,
धनंजय शिंदे, दीपक खडेकार, उदय चव्हाण, भुषण बाळे,
आणि देवदत्त कुलकर्णी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button